कडाव : प्रतिनिधी
विद्यार्थी व तरुणांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिलावी या उद्देशाने कर्जत तालुका भारतीय जनता युवा मोर्च्याचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भाजप कार्यकारीणीच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन निबंध व वक्ता महाराष्ट्राचा या बँनरखाली वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात
आले आहे.
कर्जत तालुका भाजप युवा मोर्चाच्या वतीने दिनांक 15 मे ते 30 मे पर्यंत 16 ते 35 वयोगटातील नागरीकांसाठी ऑनलाइन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कोरोना महामारीनंतर भारतीय युवकांपुढील आव्हाने, देशाला कोरोना संकटापासून सोडविण्यासाठी माझे योगदान काय, टाटा कुटुंब भारताला मिलालेल वरदान, पी. एम केअर फंड – एक क्रांतिकारी पाऊल यापैकी एका विषयावर 750 ते 1000 शब्दांत निबंध लिहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे वक्ता महाराष्ट्राचा या वक्तृत्व स्पर्धेसाठी आदी देश नंतर मी, कोरोना आर्थिक मंदी की, भारतास संधी, स्वराज संस्थापक छक्षपती शिवाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, युवकांचे प्रेरणास्थान – स्वामी विवेकानंद, नागरीकत्व संशोधन कायदा (सीएए) या पैकी एका विषयावर जास्तीत जास्त पाच मिनिटांचा व्हिडीओ बनवून भारतीय जनता युवा मोर्चा कर्जत मंडल या फेसबुक लिंकवर पोस्ट करावा व 9850057378 या व्हॉट्सअॅपवर टाकण्यात यावे असे आवाहन आयोकजांकडून करण्यात आले आहे. तसेच कर्जत भाजप युवा मोर्चा आयोजित या स्तुत्य उपक्रमात फक्त कर्जत तालुक्यातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धेच्या निकालाची तारीख 30 मे रोजी कलविली जाईल. दोन्ही स्पर्धत प्रथम पारीतोषिक 2000 रुपये व द्वितीय पारीतोषिक 1000 रुपये ठेवण्यात आले आहे.