Breaking News

पेण तालुक्यात तीन नवे कोरोना रुग्ण

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यात तीन नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या तिघांची कोविड-19  टेस्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती तहसीलदार अरुणा जाधव यांनी दिली. नव्या रुग्णांमुळे पेण तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार

झाली आहे.

वडखळ येथील एका 57 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. याआधी या महिलेचा नऊ वर्षीय नातू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्याला मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्याच्यासोबत असताना त्याच्या आजीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे, तर कामार्ली येथील दोन रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ठाण्याहून वडील, दोन मुली आणि एक मुलगा असे चार जणांचे कुटुंब कामार्ली येथे आले होते. त्यांच्या आईचा ठाणे येथे मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर या चौघांची स्वॅब टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी 24 व 25 वर्षीय मुलींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, तर मुलाचा रिपोर्ट प्रलंबित आहे.

पेणमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या चार झाली आहे. यापैकी सर्वात पहिला रुग्ण असलेला वडखळ येथील नऊ वर्षीय बालक कोरोनामुक्त झाला असून, उर्वरित तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply