नवी मुंबई : नवी मुंबईत बुधवारी (दि. 20)एकाच दिवसात सहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला असून 43 रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या 1364 झाली आहे. मृतांची एकूण संख्या 45 झाली आहे. आजतागायत 9153 नागरिकांची कोरोना टेस्ट झाली असून एकूण 6922 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर अद्यापही 867 अहवाल प्रलंबित आहेत. बुधवारी 22 व्यक्ती बर्या झाल्या असून त आतापर्यंत बर्या झालेल्या व्यक्तींची संख्या 532 झाली आहे. बुधवारी बाधित झालेल्या रुग्णांत बेलापूर 03, नेरुळ 09, वाशी 02, तुर्भे 08, कोपरखैरणे 13, घणसोली 06, ऐरोली 01 व दिघा 01 विभागवार रुग्णांचा समावेश आहे.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …