Breaking News

धाटाव एमआयडीसीत लॉकडाऊन काळात 800 कोटींचे उत्पादन बुडाले

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाचे संकट आल्यावर जगभर मंदीचे सावट आहे. महत्त्वाचे म्हणजे औद्योगिक क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. रोहा तालुक्यातील सर्वात जुन्या असलेल्या धाटाव औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना याचा फटका बसला आहे. धाटाव औद्योगिक क्षेत्रात सुमारे 800 कोटींचे उत्पादन बुडाले आहे.

देशात व राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होत असताना त्यावर उपाय म्हणून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. धाटाव एमआयडीसीतील कारखाने सध्या 50 टक्के क्षमतेने चालू असून, लॉकडाऊनच्या काळात या कारखान्यांचे 800 कोटींपेक्षा जास्त उत्पादन बुडाले, तर या उत्पादनातून  सरकारचा जवळजवळ 100 कोटींच्या आसपास महसूल बुडाला आहे.

धाटाव औद्योगिक क्षेत्रात सद्यस्थितीत रासायनिक व अन्य असे मिळून 36 कारखाने चालू आहेत. या कारखान्यांत कंत्राटी व कायमस्वरुपी 12 हजारांच्या आसपास कामगार काम करीत आहेत. या कारखान्यांवर स्थानिक अनेक वर्कशॉप, पुरवठादार, ट्रॅव्हल्स अशा आठ हजारांच्या आसपास लोकांना रोजगार मिळत होता. यावर रोहा, कोलाड बाजारपेठही अवलंबून होती, मात्र लॉकडाऊनमुळे कारखाने बंद ठेवण्यात आल्याने कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. बारदशकर यांनी दिली.

समस्याच समस्या

लॉकडाऊनच्या निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यानंतर 50 टक्के क्षमतेने कारखाने चालू झाले आहेत, परंतु परप्रांतीय कामगार मूळ गावी गेला आहे. त्यामुळे मोठी अडचणी निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ ही समस्या निर्माण झाली आहेच. त्याचबरोबर कच्च माल मिळविण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. कारखान्यात एखादे यंत्र बिघडले तर ते दुरस्त करण्यासाठी लागणारे कुशल कारागीर हे पुणेम मुंबई शहरात अडकले आहेत, तर दुसरीकडे खराब झालेले  यंत्राचे नवे भाग मिळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply