Breaking News

कोरोना लढ्यात लोणेरे येथील विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून योगदान

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास 21 हजार रुपयांचा धनादेश

माणगाव : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कर्मचारी सहकारी पतसंस्थेकडून सामाजिक जाणीवेतून कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्याकरिता रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला 12 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. तहसीलदार प्रियांका आयरे-कांबळे यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

या वेळी पतसंस्थेचे चेअरमन सुरेश लाड, खजिनदार महेश कोळी, संचालक संदीप बोरसे, व्यवस्थापक  विनायक तवसाळकर तसेच विकास मगर उपस्थित होते. राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात केलेल्या या मोलाच्या आर्थिक सहकार्याबद्दल तहसीलदार आयरे-कांबळे यांनी संस्थेचे विशेष आभार मानले तसेच तालुक्यातील इतर सामाजिक संस्था-संघटनांनी, कंपन्यांनी,दानशूर व्यक्तींनी या संकटसमयी मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply