नगरसेविका वृषाली वाघमारे यांचे निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन पनवेल येथे सेक्टर 13 व 14 मध्ये कोविड 19 च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे तेथील सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे सोपे जाऊ शकते. म्हणून नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 च्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.