Breaking News

नागरिकांची आरोग्य तपासणी करावी

नगरसेविका वृषाली वाघमारे यांचे निवेदन

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केली आहे. या संदर्भात पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.  नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन पनवेल येथे सेक्टर 13 व 14 मध्ये कोविड 19 च्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे तेथील सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी होणे गरजेचे आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यावर त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करणे सोपे जाऊ शकते. म्हणून नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 च्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी मागणी  आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply