Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांचा नागोठणे विभागात पाहणी दौरा

नागोठणे ः प्रतिनिधी

स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी बुधवारी (दि. 10) नागोठणे विभागाला भेट देऊन निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. दौर्‍याचा शुभारंभ पळस येथून केल्यावर आमदार रविशेठ पाटील यांनी नागोठणे शहराच्या विविध भागांची पाहणी केली. चिकणी तसेच वांगणी विभागातील अनेक गावांना त्यांनी भेट दिली.

या दौर्‍यादरम्यान आमदार रविशेठ पाटील यांनी चिकणी येथे भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती देवरे यांच्या निवासस्थानी भेट देत देवरे यांचे ज्येष्ठ बंधू यशवंत देवरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याबद्दल मारुती देवरे तसेच यशवंत देवरे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या नागोठणे दौर्‍यात भाजपचे रोहे तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

‘सामना’ पन्नाशीचा झाला…

काही कलाकृतींचे महत्त्व व अस्तित्व हे कायमच अधोरेखित होत असते. ते चित्रपटगृहातून उतरले तरी त्यांचा …

Leave a Reply