Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सातार्‍यात कवितासंग्रहाचे प्रकाशन

कवी शशिकांत बडेकर यांना शुभेच्छा

सातारा ः प्रतिनिधी
सातारा येथील कवी शशिकांत बडेकर यांच्या ‘प्रतिक‘ या कवितासंग्रहाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 4) करण्यात आले. या वेळी त्यांनी कवी बडेकर यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
सातार्‍यातील छत्रपती शिवाजी कॉलेज येथे झालेल्या कवितासंग्रहाचे प्रकाशनावेळी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सुभाष वाघमारे, अमोल उनउने आदी उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, कवी शशिकांत बडेकर यांच्या कवितेत, निसर्ग, प्रेम, सामाजिक वास्तव व ऋणानुबंध इत्यादी विविध प्रकारचा आशय आलेला असून आयुष्यात वेदना असल्या तरी दुःखातूनसुद्धा माणसाने कसे बाहेर पडावे असा विचार
आलेला आहे. बडेकर आशावादी कवी आहेत. संवेदनशील कवी माणूस आपल्या प्रतिभेने व्यक्तिगत जीवनात व समाजात घडणार्‍या घटना सुंदर शब्दात कसा टिपतो हे त्यांच्या कविता वाचून दिसून येईल. आजच्या युगातील भावनिक कविता असणारा ‘प्रतिक’ कवितासंग्रह तरुणांना तसेच ज्येष्ठांना वाचण्यासारखा व अनुभवण्यासारखा असून हा कवितासंग्रह लोकप्रिय होईल अशा शुभेच्छा मी देतो.
कवी शशिकांत बडेकर कविता संग्रहनिर्मिती संदर्भात बोलताना सांगितले की, मी कवितासंग्रह छापण्याची कल्पना लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब यांच्याकडे मांडली, तेव्हा त्यांनी मला सर्वतोपरी सहकार्य केले आणि त्यातूनच माझा कवितासंग्रह पूर्णत्वास आला. साहित्यवेल प्रकाशन सातारा यांनी प्रकाशनासाठी तसेच मुद्रक कृष्णा चिंचकर व मुद्रितशोधनास डॉ. संजयकुमार सरगडे यांनी सहकार्य केले. कवितासंग्रह निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाचे मार्गदर्शन व पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचेही बहुमोल सहकार्य मला मिळाले आहे.
या छोटेखानी कार्यक्रमास अमृत माने, गणेश बडेकर, अनिकेत भिसे, हर्ष सायनाकर, पत्रकार प्रकाश वायदंडे, शुभम जाधव, निखील खरात, बाबू बडेकर, संदीप बडेकर, राज बडेकर, शिरीष जंगम इत्यादी हितचिंतकही उपस्थित होते.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply