Breaking News

पनवेल येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा मदत निधी पनवेल व उरण तालुक्यातील आदिवासी, गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोहचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायु जीवनासाठी भारतीय जनता पक्ष पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पनवेल भाजप कार्यालय येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष उभारण्यात आला आहे.
या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दि. 1 जानेवारी) सकाळी 10.30 वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
पनवेल आणि उरण विधानसभा क्षेत्रातल्या प्रत्येक नागरिकांसाठी हे कार्यालय वैद्यकीय सहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून सदैव काम करणार आहे. या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला पदाधिकारी व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हाध्यक्ष, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे यांनी केले आहे.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply