आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी (दि. 4) विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्जनशील आणि बौद्धिक कौशल्यांचे दर्शन घडले. प्रदर्शनाचे उद्घाटन स्कूलचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
प्रदर्शनाला वेस्टर्न हिल्स स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. वसा शिव प्रकाश, न्यू होरायझन स्कूलच्या मुख्याध्यापिका अमिता दत्ता, लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य स्वप्नाली म्हात्रे, रयत शिक्षण संस्था रायगड विभागाचे पीआरओ बाळासाहेब कारंडे, हेड क्लार्क श्री. गुजर यांच्यासह पालक उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिक्षणातील आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि सर्जनशीलतेचे महत्त्व आपल्या भाषणात सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक अविनाश कुलकर्णी, समन्वयिका रूहल दुबे, अर्चना माथुर तसेच सर्व शिक्षकांनी या प्रदर्शनास उपस्थित मान्यवर आणि पालकांचे आभार
मानले तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले.