Breaking News

पनवेलमध्ये भाजप सदस्य नोंदणी अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप महाराष्ट्र प्रदेश संघटन पर्वाच्या निमित्ताने रविवारी (दि 5) महापालिका प्रभाग क्रमांक 18मध्ये तसेच प्रदेश कामगार मोर्चाच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत आढावा घेतला तसेच पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.
महापालिका प्रभाग क्रमांक 18मध्ये झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रभागातील नागरिक, व्यापारीवर्ग, जेष्ठ नागरिक यांनी सहभाग नोंदवला. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, सोशल मीडिया ओबीसी मोर्चा जिल्हा प्रभारी तथा शहर संयोजक प्रसाद हनुमंते, प्रभाग अध्यक्ष महेश सरदेसाई, ज्येष्ठ नागरिक सेल संयोजक उपेंद्र मराठे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र कामगार मोर्चाच्या वतीने आयोजित सदस्य नोंदणी अभियानावेळी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, उपाध्यक्ष अनिल खोपडे, भारतीय जनरल कामगार मोर्चाचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत, माजी नगरसेवक राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply