सुशीला घरत यांची सामाजिक बांधिलकी
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका सुशीला जगदीश घरत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नवीन पनवेल प्रभाग 17 मधील 550 जणांना स्वखर्चाने जीवनावश्यक अन्न धान्य तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्या आर्सेनिक अलबम 30 गोळ्यांचे मोफत वाटप केले.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेऊन फिजिकल डिस्टन नियमांचे पालन करून झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल मंडल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी उपनगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका वृषाली वाघमारे, माजी नगरसेविका वर्षा नाईक, विभागीय अध्यक्ष विजय म्हात्रे, सामजिक कार्यकर्ते जगदीश घरत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोना व त्यामुळे आलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्षम आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेलसह इतर तालुक्यातही अन्नधान्य, मास्क, सॅनिटायझर, अशा विविध वस्तू मोफत वाटप करून लाखो नागरिकांना मोलाची मदत केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका सुशीला घरत यांनी हा उपक्रम राबविला.