Breaking News

चौक बाजारपेठेतील तीन दुकानांचे आगीत नुकसान

मोहोपाडा : प्रतिनिधी

चौक बाजारपेठेमध्ये शॉकसर्कीटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकानांचे मोठे नुकसान झाले. अथक प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले. परंतु आगीत तिन्ही दुकानांचे सामान जळून खाक झाले.

चौक बाजारपेठमध्ये अनंत चौधरी, चंद्रकांत चौधरी व चित्तरंजन चौधरी यांची पत्रावळी, प्लास्टिक ड्रम, झाडू, किराणा साहित्य यांची दोन दुकाने असून तिसरा दुकान गाळा बंद असतो, दुकानाला वीज पुरवठा करणार्‍या विद्युत मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आगीने पेट घेतला, दुपार असल्याने बाजारपेठ शांत होती, तिन्ही घरमालक तिथे रहात नाहीत. दुकानातून धूर निघू लागल्याने परिसरातील लोकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, तर फायरब्रिगेड यांनाही कळविले, सद्यपरिस्थितीत नेट नसल्याने वेळेवर फोन न लागल्याने तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले, लोकांनी पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. खोपोली नगरपालिका,एचआयएल व रिलायन्स रसायनी येथून तीन अग्निशमनदलाचे बम्ब आल्यावर आग पूर्णपणे आटोक्यात आली.

चौकचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर, खालापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर वल्हे व त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व अग्निशमनदलाला पाचारण केले. तर तलाठी बोराटे यांनीही खालापूर तहसीलदार यांना कळविल्यावर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी घटनास्थळी भेट दिली व आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply