पनवेल : रायगड जिल्ह्यात सोमवारी (दि. 15) सलग दुसर्या दिवशी कोरोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, 63 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पनवेल महापालिका हद्दीत 44, पनवेल ग्रामीणमध्ये सात, पेण तालुक्यात सहा, अलिबाग तालुक्यात तीन, माणगाव तालुक्यात दोन आणि उरण तालुक्यात एक रुग्ण आढळला आहे, तर मृतांमध्ये पनवेल महापालिका हद्दीतील खारघर, कळंबोली व नवीन पनवेल या तीन आणि कर्जतमधील एक अशा चार रुग्णांचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 1853वर जाऊन पोहचला असून, मृतांची संख्या 82 इतकी झाली आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …