रोहे ः प्रतिनिधी
गोवे-कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात बुधवारी (दि. 28) निबंध व वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेसाठी ’सोशल मीडिया व मी’ आणि ’21व्या शतकातील विज्ञानाची प्रगती’ हे विषय देण्यात आले होते, तर वादविवाद स्पर्धा ’370 कलम रद्द केले : योग्य की अयोग्य’, ’महाविद्यालयीन निवडणुका असाव्यात की नसाव्यात’, ’आरक्षण असावे की नसावे’ अशा विषयांवर घेण्यात आली. या वेळी प्राचार्य डॉ. शंकर मुंडे, उपप्राचार्य जगदीश पाठक, प्रा. सूर्यकांत आमलपुरे, प्रा. नेहल प्रधान, प्रा. रेश्मा शेळके, प्रा. सावळे, प्रा. अडलीकर, प्रा. अनिरुद्ध मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी निलेश महाडिक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.