Breaking News

लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीचे दागिने लंपास

खोपोली : बातमीदार

लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीकडून 27 लाख 50 हजार 940 रूपये आणि दागिने हडप करणार्‍या प्रियकरा (रा. घोसाळवाडी ता. पनवेल) विरोधात पीडीतेने खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

लखोबा लोखंडेचा अवतार असलेल्या प्रियकराने त्याचे लग्न झाल्याचे देखील वर्षभर लपविले होते. खोपोलीत विरेश्वर सोसायटीत राहणारी पीडीत महिलेचे आणि प्रियकर यांचे मार्च 2019पासून प्रेमसंबध होते. प्रियकराने पीडीतेला लग्न करण्याचे आश्वासन देत तिचा वेळोवेळी शारिरिक उपभोग घेतला होता. खोपोलीत नवीन रूम घेतो असे सांगून प्रियकराने पीडीतेकडून 27 लाख 50 हजार940 रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने पार्लरचा व्यवसाय करण्यासाठी आणलेला सामान, दागिने घेतले.

पीडीत महिलेला प्रियकरापासून दिवस गेल्यानंतर तिने प्रियकराकडे लग्नासाठी विचारणा केली असता प्रियकर टाळाटाळ करू लागला. तसेच खोली घेण्यासाठी दिलेले दागिने व पैशाबाबत तसेच पार्लरचा सामानाबाबत पीडीतेनी विचारल्यावर प्रियकराने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलाचा धाक दाखवुन मारण्याची धमकी दिली. पीडीता प्रियकराला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु प्रियकर टाळाटाळ करत असल्याने अखेर फसवणूक झालेल्या पीडीतेनी खोपोली पोलीस ठाणे गाठत प्रियकराविरोधात तक्रार दिली आहे.

याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे प्रियकराविरोधात भा. दं. वि. कलम  376 एन, 417, 420, शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 25(1) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरिक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिष आस्वर हे करीत आहेत.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply