Breaking News

कळंबोलीत आढळला पुरुषाच्या हाडांचा सापळा

कळंबोली : रामप्रहर वृत्त

कळंबोलीतील लोखंड बाजारातील एसिसी सिमेंट कापणीच्या मागील बाजूस व कळंबोली रेल्वे ट्रॅकच्या बाजूला खोदलेल्या खड्ड्यात एक पुरुष जातीच्या व्यक्तीचा हाडांचा सापळा आढळल्याने एकच खळबळ

उडाली आहे.

याबाबत अधिक तपास कळंबोली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश घाडगे करीत आहेत.

कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत 24 जूनच्या रात्री साडे नऊच्या सुमारास एसीसी सिमेंट कंपनीच्या पाठीमागे, कळंबोली रेल्वे ट्रॅकच्या पटरीच्या बाजूला खोदकाम केलेल्या जागेमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचा व्यक्तीचा अंदाजे वय-45 ते 50 वर्षेचा हाडांचा सांगाडा मिळून आला आहे. या व्यक्तीच्या अंगात निळ्या रंगाची ’डएछअढए’ असे लिहलेली कुजलेली पॅन्ट व मरूम रंगाचा कुजलेला स्थितीचा शर्ट मिळून आला आहे.

याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि. क्र. 22/2020 सीआरपीसी 174 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. या अकस्मात मृत्यूच्या घटनास्थळी पनवेल परि-2 पोलीस उपआयुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस उपआयुक्त रविंद्र गिड्डे, कळंबोली पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी भेट दिली असून त्यांचे मार्गदर्शनाखाली पुढील अधिक चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे हे करीत आहेत. तरी याबाबत काही माहिती मिळाल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे मोबाइल क्रमांक 8425898247, कळंबोली पोलीस ठाणे फोन नं.022-27423000 वर संपर्क साधावा, असे आवाहन कळंबोली पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply