मोहोपाडा : प्रतिनिधी – कानसा वारणा फाऊंडेशनच्या सदस्या तसेच दिपकृष्ण नागरी पतसंस्था मर्यादित संचालिका कै. संगिता निकम यांच्या निधनानंतर कानसा वारणा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक दीपक गणपत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू व गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले. विविध जातींच्या पाचशे वृक्षांचेही वाटप करण्यात आले, तर स्मशानभूमीत पिंपळ या वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वेळी कानसा वारणा फाऊंडेशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, युवा अध्यक्ष महेंद्र पाटील, तानाजी पाटील, महिला कार्याध्यक्ष संपदा कुलकर्णी, आकाश मोलके, अजय लोकरे, विजय लोकरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन युवा अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी चोख बजावले.