पनवेल : बातमीदार – ट्रकमध्ये भरलेला माल इतर कंपन्यांना पोहचवण्यासाठी दिलेला असताना त्या मालाचा अपहार केल्याची घटना तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी आठ लाख 94 हजार दोनशे रुपयाच्या मालाचा अपहार केला आहे.
बदलापूर येथील मनोहर शंकर पाटील यांचा अथर्व मेटल्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचा स्टील प्रोसेसिंगचा व्यवसाय तळोजा येथे आहे. ते विविध कंपन्यांकडून स्टील सीआर कॉईलचा माल विकत घेऊन ऑर्डर प्रमाणे विविध साईजने कटिंग करून विविध कंपन्यांना विक्री करत असतात. त्यांना नाशिक सातपूर येथे कोईल हवी असण्याची ऑर्डर मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सात हजार 320 किलो वजनाचे सीआर सीट्स, आठ हजार 500 किलो वजनाचे सीआर ऑइल, नाशिक येथे पोहोचते करण्यासाठी ट्रान्सपोर्ट मार्फत ट्रक (क्र. एमएच 41 एऊ 6156) मध्ये पाठवून दिले. या वेळी मनोहर पाटील यांनी वेळोवेळी रहमान याच्याकडे माल पोहचला का याची विचारणा केली तेव्हा रहमान याने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. रहमान आणि त्याचा साथीदार अनोळखी ट्रक चालक यांनी आपसात संगणमत करून आठ लाख 94 हजार 298 रुपये किमतीच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.