उरण : वार्ताहर – श्रावण महिन्यातील पहिला सोमवारी (दि.27) रोजी असल्याने महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी गर्दी असायची परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता सर्वत्र लॉकडाऊन केल्याने मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे भाविक शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चा करण्यासाठी जाऊ शकले नाहीत त्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर येत आहे.
उरण शहरातील देऊळवाडी येथील असलेल्या संगमेश्वर मंदिर बंद होते. देऊळवाडीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेले बेल विक्रेत्यांकडून बेल घेऊन मंदिरात भक्त गण जात होते. परंतु मंदिर बंद असल्यामुळे भक्तांनी आणलेली फुले व बेल मंदिराच्या दरवाज्यावरच अर्पण करीत होते व महादेवाला स्मरण करीत असल्याचे दिसत होते व आपल्या देशावर आलेले कोरोनाचे संकट नष्ट व्हावे, अशी प्रार्थना भक्तगण
करीत होते.
आम्ही दरवर्षी देऊळवाडी येथे बेल विण्यासाठी येत असतो परंतु कोरोनाचे संकट असल्याने आम्ही आणलेला बेल आज कमी भाविकांनी खरेदी केला. त्यामुळे आमच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. 10 रुपयास बेल पानांचा वाटा आम्ही विकत आहोत, असे मोठीजुई येथून आलेल्या बेल विक्रेत्या ज्योती दत्तात्रेय शिंदे यांनी सांगितले.
जेएनपीटीच्या अॅडमिन ऑफिसजवळ असलेल्या शेवा गावचा शंकर मंदिराच्या येथे दरवर्षी परिसरातील पाच ते सहा हजार भाविक दर वर्षी दर्शनासाठी येत असतात. परंतु यंदाच्या कोरोना संकटामुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ मिळू शकत नही त्याबद्ल शंकर मंदिराचे पुजारी व मालक संतोष शिवराम दर्णे यांनी भाविकांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
उरण तालुक्यात घारापुरी केगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकेश्वर येथील शंकर मंदिर, उरण शहरातील बोरी गावातील होणेश्वर मंदिर, देऊळवडी तील संगमेश्वर मंदिर, उरण रेल्वे स्टेशन येथील निकांटेश्वर मंदिर, सोनारी गावा जवळील असलेले शंकर तांडेल यांचे पद्लेश्वर मंदिर आदी महादेवाची मंदिरे कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली होती.