Breaking News

डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानने केली कब्रस्थानची स्वच्छता

अलिबाग : प्रतिनिधी : रेवदंडा येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रविवारी (दि. 7) अलिबाग तालुक्यात मुस्लीम दफनभूमी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात अलिबाग तालुक्यातील अलिबाग, थळ, मुशेत, रामराज, देवघर, शेखाचेगाव, रेवदंडा, नागाव, श्रीगाव, चौल, पोयनाड, पेझारी येथील मुस्लीम दफनभूमीं परिसराची स्वच्छता करण्यात आली.

रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या या स्वच्छता मोहिमेमध्ये श्रीसदस्यांच्या सोबत मुस्लीम समाजातील बांधवांनी सहभाग घेऊन राष्ट्रीय एकात्मिकतेचा संदेशही दिला. यामध्ये प्रामुख्याने अलिबागचे फारूख सय्यद, अब्दुल सय्यद, रेवदंड्याचे खलील तांडेल, मुज्जफर सत्तार, नागावचे उस्मान शेरखान व हसनखान, शेखाचे गावचे अशरफ घोरी, गुलाम कुरेशी, पोयनाडचे मुराद बुरान, अनवर बुरान, श्रीगावचे अन्वर ढाले, र.उ.फ बेलोसकर, पेझारीचे नूर छापेकर, नदीम बरमारे यांच्यासह अनेक मुस्लीम बांधवांनी श्रीसदस्यांच्या सोबत स्वच्छतेमध्ये सहभाग घेतला होता.

आज झालेल्या दफनभूमी स्वच्छता अभियानामध्ये एकूण 1872 श्रीसदस्यांनी एकूण 12 दफनभूमीतील 60517 चौ.मी. परिसर स्वच्छ केला असून, त्यातून 34.280 टन कचरा गोळा करण्यात आला.  प्रत्येक व्यक्तीला स्वच्छतेचे महत्त्व कळावे व त्यांच्यात जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील स्मशानभूमीची स्वच्छता झाल्यानंतर, मुस्लीम समाजाच्या दफनभूमी परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

नागोठणेतही स्वच्छता मोहीम

नागोठणे : प्रतिनिधी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी नागोठणे, मीरानगर आणि बेणसे या तीन ठिकाणच्या कब्रस्तानात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नागोठणे विभागातील तीनशे श्रीसदस्य सहभागी झाले होते. या तीन ठिकाणांहून एकूण 14 टन कचरा गोळा करण्यात आला, असे सांगण्यात आले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply