Breaking News

नुकसानग्रस्त शाळांना मदतीचा हात

चंद्रमा एज्युकेशन संस्थेचा उपक्रम

पाली ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळाने सुधागड तालुक्यातील अनेक शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शाळांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी हात पुढे सरसावले.  ठाण्यातील चंद्रमा एज्युकेशन संस्था व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकाराने सुधागड तालुक्यातील नुकसानग्रस्त शाळांना व विद्यार्थ्यांना नुकतीच शैक्षणिक मदत देण्यात आली. पहिल्या टप्प्यातील पाच शाळांना ही मदत दिली असून उर्वरित शाळांना पुढील टप्प्यात मदत मिळणार आहे.

सुधागड तालुका गटशिक्षण अधिकारी शिल्पा दास यांनी चंद्रमा संस्थेकडे साहित्य मागणीबाबत शाळांना कळविल्याने हे शक्य झाले. त्याप्रमाणे नुकसानग्रस्त शाळांनी संस्थेशी संपर्क करून मागणी केली. यामध्ये विद्यार्थ्यांना एकेरी व दुरेघी वह्या, पेन्सिल, पट्टी आदी साहित्यासोबत शाळेसाठी सॅनिटायझर स्टँड व सॅनिटायझर, संस्थेकडून बनविण्यात आलेले क्राफ्टचे सजावटीचे साहित्य देण्यात आले. हे वाटप जिल्हा परिषद शाळा-दहीगाव येथे कोविडचे नियम व सुरक्षितता पाळून करण्यात आले. सुधागडमधील रा. जि. प. च्या दहीगाव, नेणवली, पेंढारमाळ, चिवे आदिवासीवाडी व वारसबोडण या पाच शाळांना पहिल्या टप्प्यात शैक्षणिक मदत मिळाली. पुढील टप्प्यात तालुक्यातील उर्वरित शाळांना मदत मिळणार आहे. तसेच संस्थेकडून भविष्यात शाळांची गरज पाहून मदत करणार असल्याचे संस्थेचे प्रेसिडेंट मोहनिश डांगे व व्हाइस प्रेसिडेंट मनीष डांगे यांनी संगितले. शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे दहिगाव शाळेचे मुख्याध्यापक संकपाळ, उपशिक्षक योगेश चव्हाण यांनी सुरक्षित नियोजन केले. यासाठी दहीगाव ग्रामपंचायत सरपंच देशमुख ताई व सदस्य मनवे यांनी सहकार्य केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply