Breaking News

पनवेलमध्ये भाजप महिला मोर्चाची बैठक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच करण्यात येणार्‍या कामांचा आढावा घेण्याकरिता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पदाधिकार्‍यांची आढावा बैठक सर्वत्र घेण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल तालुका महिला मोर्चाची आढावा बैठक मंगळवारी (दि. 27) दक्षिण रायगड सरचिटणीस डॉ. मंजुषा कुद्रीमोती यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झाली.
या बैठकीस महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रज्ञा धवन, रश्मी लुडबे, सुषमा मसुरकर, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, माजी नगरसेविका दर्शना भोईर, उरणच्या माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पनवेल तालुका उपाध्यक्ष समिना साठी, चिटणीस शिल्पा म्हात्रे, शहर सरचिटणीस सपना पाटील, सचिव स्नेहल खरे, आशा मुंडे, नीता मंजुळे, निर्मला घरत, तृप्ती चौरे, निता अधिकारी, खारघर शहर अध्यक्ष साधना पवार, कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, उरण तालुका अध्यक्ष राणी म्हात्रे, सदस्य शमिता ठाकूर तसेच मोना आडवाणी, साधना पवार, दुर्गा सहानी, रश्मी भारद्वाज, अश्विनी भुवड यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या.
या बैठकीत रत्नप्रभा घरत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या कामांची माहिती उपस्थितांना दिली तसेच महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी एकजुटीने आणि उत्साहाने काम करीत भाजप घराघरापर्यंत पोहचविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत असलेल्या या बैठकीत धन्यवाद मोदीजी कार्ड, एसईओचे फॉर्म, सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रभावीपणे काम करण्याच्या दृष्टिकोनातून ट्विटर आणि फेसबुकवर अकाउंट बनवणे तसेच व्हॉट्सअ‍ॅप गु्रप तयार करून महिला संघटना मजबूत करणे या विषयांचा आढावा घेण्यात आला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply