मुरुड, रेवदंडा : प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सी फेस व रोटरी क्लब ऑफ अलीबाग सी शोअर यांच्या संयुक्त विद्यमाने खानाव जवळील वेलटवाडी या आदिवासी वाडीवरील निसर्ग चक्रीवादळग्रस्त पंचवीस आदिवासी कुटुंबियांना एका कार्यक्रमात अन्नधान्य व जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप केले गेले.
या वेळी नायब तहसीलदार अजित टोळकर, सर्कल अधिकारी मोकल, तलाठी म्हात्रे मॅडम, खानाव ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र गोंधळी तसेच रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअरचे कार्यवाह निमिष परब, प्रकल्प संचालक डॉ. निलेश म्हात्रे, सुधीर काटले, आनंद वालेकर व इंजिनियर कौस्तुभ कुलकर्णी उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळ ग्रस्त गरजू आदिवासी कुटुंबियांना सणाच्या दिवसात आम्ही अन्नधान्याची मदत करू शकलो ही आमच्यासाठी एक समाधानाची बाब आहे, असे रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सी फेस चे अध्यक्ष निर्मल दोशी यांनी नमूद केले. तसेच कोरोनामुळे जरी मुंबईहून तिथे प्रत्यक्ष येणे जमले नाही तरी रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअरच्या सहकार्याने आम्ही हा कार्यक्रम पार पाडू शकलो याचा आनंद वाटतो असे क्लबच्या प्रकल्प संचालिका पूर्णा मेहता व सभासद अभय भालेराव यांनी सांगितले. यापुढेही अशा प्रकारचे संयुक्त समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातील असा मनोदय रोटरी क्लब ऑफ अलिबाग सीशोअरचे अध्यक्ष डॉ. किरण नाबर यांनी व्यक्त केला.