विचुंबे येथे स्वच्छता मोहीम
पनवेल : रामप्रहर वृत्त – जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व गरीब, वंचित, दलित, आदिवासी आणि शेतकर्यांसाठी देवदूत प्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढदिवसानिमित्त सेवासप्ताह अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विचुंबे भाजपच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत के. सी. पाटील, रवींद्र भोईर, किशोर सुरते, प्रमोद भिंगारकर, नितिन भोईर, अनिल भोईर, अविनाश गायकवाड, गणेश भिंगारकर, संदीप पाटील, विनोद कदम, विशाल दळवी, संतोष कोटकर, अमर इंगळे, संजीवन तावडे, संतोष नाखवा, अनिल राठोड, सतीश भगत, काशीद यांनी सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबवली.
कोप्रोली येथे वृक्षारोपण
उरण : वार्ताहर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सेवा सप्ताह कार्यक्रम राबविन्यात येत आहे. त्यांच्याच एक भाग म्हणून भाजप कोप्रोली व भाजप उरण पूर्व विभाग यांच्या वतीने सोमवारी (दि. 21) कोप्रोली हुतात्मा मोरेश्वर न्हावी स्मारक येथे वृक्षारोपण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, उरण तालुका पदाधिकारी दत्तराज म्हात्रे, सहखजिनदार सुनील पाटील, युवा विभाग चिटनीस कल्पेश म्हात्रे, उरण शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदेश पाटील, प्रीतम म्हात्रे, हितेश म्हात्रे, विक्रांत पाटील, नीलेश पाटील, योगेश गावंड, बबन म्हात्रे, विक्रांत पाटील, गजानन पाटील, जीवन पाटील, शेखर म्हात्रे, विकास म्हात्रे (विकि भाई) आदि उपस्थित होते.