आठ जणांचा मृत्यू; 267 रुग्णांची कोरोनावर मात
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि.11) कोरोनाचे तब्बल 413 नवीन रुग्ण आढळले असून आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 287 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 190 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 126 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 77 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात खांदा कॉलनी सेक्टर 8, खारघर सेक्टर 36, कामोठे सेक्टर 25, कळंबोली येथील सेक्टर 3ई व सेक्टर 3 येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2426 झाली आहे. कामोठेमध्ये 57 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3132 झाली आहे. खारघरमध्ये 84 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 2910 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 42 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2682 झाली आहे. पनवेलमध्ये 57 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2576 झाली आहे. तळोजामध्ये सात नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 672 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 14398 रुग्ण झाले असून 12017 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.46 टक्के आहे. 2048 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 333 जणांचा मृत्यू झाला आहे.
कर्जत तालुक्यात 22 नवे पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
कर्जत तालुक्यात शुक्रवारी एका डॉक्टरसह 22 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजपर्यंत तालुक्यात 1173 रुग्ण सापडले असून 898 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 48 वर गेली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये नेरळ तीन, माथेरान तीन, कर्जत शहर, मुद्रे बुद्रुक, दहिवली येथे प्रत्येकी दोन, आकुर्ले, मुद्रे खुर्द, सांगवी, जाम्बरुंग, सावळे, कोंडीवडे, डिकसळ, मार्केवाडी, चोरावळे, शेलू येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
उरण तालुक्यात 18 नवे बाधित
पाच रुग्णांचा मृत्यू; 21 जणांना डिस्चार्ज
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे 18 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 21 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात तब्बल पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये द्रोणागिरी कॉलनी दोन, नागाव पोलीस लाईन दोन, चाणजे दोन, धुतुम, विजय नगर, नागाव सर्वदेवाडी, नागाव इंदू कॉलनी, नागाव म्हातवली, कामगार वसाहत, केगाव, भेंडखळ, कुंभारवाडा, आवरे, कोटनाका, विंधणे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर आवरे, कोटनाका, विंधणे, धाकटी जुई व मांडल आळी नागाव येथील रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1598 झाली आहे. त्यातील 1274 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 245 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 79 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाडमध्ये उपचारा अभावी एकाचा मृत्यू
महाड : प्रतिनिधी
महाडमध्ये कोरोना संसर्ग वाढत असून शुक्रवारी 92 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तालुक्यात 100 जनांनी कोरोनावर मात केली असुन आहे. तर दासगाव येथील एका रुग्णाला एकाला हृदयविकारचा झटका येऊन, उपचार न मिळाल्याने रिक्षातच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोरोना संसर्ग काही केल्या कमी होताना दिसत नाही. महाड मध्ये 211 रुग्ण उपचार घेत असून, 1044 रुग्ण बरे झाले आहेत, तर 50 जणांचा मृत्यू झाला आहे.