रसिकांच्या भेटीला येणार नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म नेटपॅक
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त – कामोठे येथील रहिवासी आणि कलाकार श्री वैभव अनंत महाडिक आणि त्यांची टीम येत्या जानेवारी 2021 ला लोकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत, नवीन ओव्हर द टॉप म्हणजेच ओटीटी प्लॅटफॉर्म, त्याच नाव आहे, नेटपॅक… आणि त्यांचे ब्रीदवाक्य आहे. अ कमप्लिट फॅमिली पॅक एन्टंरटेन्टमेन्ट म्हणजेच हा ओटीटी सर्वसमावेशक असे विषय घेऊन मैदानात उतरणार आहे. जे तीन वर्षांच्या मुलापासून ते 90 वर्षाच्या आजोबांपर्यंत सर्व जण केव्हाही कुठेही पाहू शकतात. नेटपॅकच्या संकेत स्थळाचे (वेबसाईट ुुु.पशींरिलज्ञ.ले.ळप)चे ऑनलाइन उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. त्या वेळी त्यांनी सर्व टीमला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नेटपॅकचे ओटीटी अॅप बाजारात यायला अजून काही काही महिन्यांचा अवधी आहे. नेटपॅक बाबतीत माहिती देताना कंपनीचे सीइओ वैभव महाडिक म्हणाले, की ह्या चॅनेलच्या माध्यमातून ते आपल्या क्षेत्रात नवीन रोजगार संधी उपलब्ध करू इच्छितात. जवळपास 1000 लोकांना तरी या उपक्रमातून रोजगार मिळेल तसेच जगभरातले अनेक विषयांवरचे नवनवीन सिनेमे, लघुपट तसेच सांगीतिक मेहफिली, लोकसंगीत, रॉक ब्यांड यांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण पाहायला मिळेल. अजूनही अनेक संकल्पना आहेत पण त्या सध्या गुलदस्त्यात आहेत असे त्यांचे म्हणणे झाले
विशेष म्हणजे या चॅनेलद्वारे वैभव महाडिक यांचा उद्देश हा फक्त मनोरंजन नसून त्यातून होणार्या नफ्यातील मोठा वाटा हा गरीब मुलांच्या शिक्षणासाठी आणी त्यांच्या संगोपनासाठी वापरला जाणारा आहे. येत्या पाच वर्षांत कंपनीच्या नफ्यातून जवळपास एक लाख गरीब मुलांसाठी अद्ययावत अनाथाश्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हे माध्यम केवळ मनोरंजन करणारे माध्यम जरी असले तरी त्याचा दुसरा महत्त्वाचा उद्देश हा कुठल्याही रस्त्यावर कोणीही गरीब मुलाने भीक मागू नये हा राहणार आहे, आणि त्यासाठी त्यांनी मनोरंजनातून समाज कार्य करण्यासाठी नेटपॅक या येऊ घेतलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. ह्या कामाची प्रेरणा त्यांना टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा ह्यांच्याकडून मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
नेटपॅक या ओटीटी प्लॅटफॉर्म ची सुरुवात येत्या जानेवारीत नेटपॅक इंटरनॅशनल चिल्ड्रन फिल्म फेस्टीव्हलने होत असून त्यासाठी जगभरातून गेल्या पाच वर्षातील लहान मुलांच्या विषयावरील चित्रपटांना, लघुपटा ना बोलावणे धाडण्यात येणार असून,यात लहान मुलांनी बनवलेल्याही चित्रपटांचा समावेश असणार आहे. विजेत्यांना लाखभर रुपयांची बक्षिसे आणि आकर्षक सन्मानचिन्ह तसेच काही निवडक फिल्म आपल्या ओटीटी वर त्यांचे हक्क घेऊन कायम स्वरूपी दाखवले जाणार आहेत.
हे चित्रपट म्हणजे सर्व रसिकांसाठी एक मेजवानी असणार आहे.
नेटपॅक ओटीटीच्या प्रमुख सल्लागार पदी ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, आणि अष्टपैलू कलाकार अशी ख्याती असणारे पुरुषोत्तम बेर्डे हे काम पाहणार असून, प्रवीण कुठार, वैभव सातपुते, प्रभाकर वारसे, दिलीप सकपाळ, मिलिंद खानविलकर, व इप्सित एंटरटेनमेंट,कामोठ्याचे सर्व तरुण रंगकर्मी तसेच टीसीएसचे माजी व आजी कलाकार लतेश पुजारी, प्रणव अभ्यंकर व इतर 25 जण असे एकूण 100 हुन अधिक कलाकार या अभिनव उपक्रमात सहभागी आहेत.
वैभव महाडिक आणि नेटपॅकच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा आणि रसिकहो तुम्हीही हे अप्लिकेशन बाजारात येईपर्यंत धीर धरा. जानेवारी 18 ला ते बाजारात येईल, तोवर नेटपॅकच्या संकेत स्थळाला जरूर भेट द्या आणि जाणून घ्या येणार्या नवनवीन उपक्रमांविषयी. ुुु.पशींरिलज्ञ.ले.ळप संपर्क :9920907680/8692991186