12 जणांचा मृत्यू; 337 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि. 1) कोरोनाचे 293 नवीन रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 334 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 234 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर 284 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 59 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 53 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल कांदेवाडी भिंगारीगाव, पाटीदार चेंबर, उरण रोड व बांठिया अग्रवाल कॉम्प्लेक्स, कामोठे सेक्टर 9 पुष्प संदीप सोसायटी, सेक्टर 19 प्रिशियस सोसायटी आणि कळंबोली सेक्टर 4 ई बिल्डिंग नं.45 येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 38 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3096 झाली आहे. कामोठेमध्ये 56 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 4276 झाली आहे. खारघरमध्ये 62 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 4300 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 54 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3641 झाली आहे. पनवेलमध्ये 21 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3397 झाली आहे. तळोजामध्ये तीन नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 781 झाली आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 19491 रुग्ण झाले असून 17254 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.52 टक्के आहे. 1805 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 432 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये 12 नवे रुग्ण
उरण : वार्ताहर – उरण तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे 12 नवे रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू व13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये चीर्ले तीन, विनायक केगाव, ग्राइडवेल कॅम्पस, करंजा, भवरा, (उरण), चारफाटा उरण प्रत्येकी एक व बोरी (उरण), द्रोणागिरी नोड प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. तर उरण व तेलीपाडा येथे प्रत्येकी एक असे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1877 झाली आहे. त्यातील 1634 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 146 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 97 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.