Breaking News

ओबीसींसाठी सैनिक शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण जाहीर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

देशभरातील सैनिक शाळांमध्ये ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पुढील शैक्षणिक सत्रापासून (2021-22) हे आरक्षण लागू होणार आहे. संरक्षण सचिव अजय कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.  संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी सैनिक स्कूल सोसायटी देशभरातील 33 निवासी शाळांचे कारभार पाहते. केंद्र सरकारच्या आरक्षण देण्याच्या निर्णयामुळे सैनिक शाळांमध्ये आता अनुसूचित जाती 15 टक्के, अनुसूचित जमाती सात टक्के, ओबीसी 27 टक्के, संरक्षण विभाग 13 टक्के आणि खुल्या प्रवर्गासाठी 38 टक्के अशी विभागणी असणार आहे. हे परिपत्रक देशभरातील सैनिक शाळांच्या प्राध्यापकांना पाठवण्यात आले आहे. परिपत्रकातील माहितीनुसार, सैनिक शाळा ज्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात असते तेथील मुलांसाठी 67 टक्के जागा राखीव असतात. उर्वरित 33 टक्के जागा इतर राज्यांतील मुलांसाठी असतात. अ आणि ब अशा पद्धतीने या यादीची क्रमवारी केली जाते. आरक्षणाचा निर्णय दोन्ही याद्यांमध्ये लागू असणार आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply