पनवेल : प्रतिनिधी
कुष्ठरुग्ण बांधवांना त्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी प्रत्येकी चार हजार रुपये विशेष अनुदान पनवेल महापालिके तर्फे देण्यात आले. त्यामुळे राज्यात कुष्ठरोग बांधवांना असे अनुदान देणारी पनवेल महापालिका ही पहिलीच महापालिका ठरली असून याचे श्रेय आमदार प्रशांत ठाकूर यांनाच असल्याचे कुष्ठरुग्ण बांधवांनी सांगितले.
पनवेल रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक 1च्या बाजूला श्री गणेश कुष्ठरुग्ण वसाहत आहे. त्यामध्ये 27 नोंदणीकृत कुष्ठरुग्ण बांधव आहेत. माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी त्यांना औषोधोपचारासाठी भत्ता देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर व महापौरांकडे लेखी केली होती. आमदार प्रशांत ठाकूर मार्गदर्शनाखाली तत्कालीन महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिकेतर्फे त्यांना दरमहा औषोधोपचारासाठी चार हजार रुपये भत्ता देण्याबाबत 24 मे 2022च्या सर्व साधारण सभेत ठराव क्रमांक 469 मंजूर केला होता. त्यासाठी 13 लाख 44 हजार रुपये आर्थिक व प्रशासकीय खर्चाला मान्यता देण्यात आली होती. सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात कुष्ठरोग कल्याण निधीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सभागृह नेते परेश ठाकूर महापौर डॉ. कविता चौतमल यांनी लक्ष देऊन समाजापासून वंचित असलेल्या कुष्ठ रुग्णांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. कुष्ठरोग बांधवांची दिवाळी आनंदातजावी यासाठी त्यांना एक लाख आठ हजार रुपये दिवाळीसाठी वाढीव भत्ता देणे वरील तरतुदीमुळे शक्य झाले. याशिवाय महानगर पालिकेने या वसाहतीला विजेची सोय करून दिली. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला आहे.
या वसाहतीत 24 कुटुंबात 85 जण राहत आहेत. त्यामध्ये 10 रुग्णांना जखमा आहेत. त्यांना रोज मलमपट्टी करावी लागते. त्यासाठी लागणारी औषधे, मलम-पट्टी आणि ड्रेसिंग करण्यासाठी त्यांना दवाखान्यात लांब जावे लागत होते. त्याचा खूप त्रास व्हायचा त्यांनी मला ही माहिती दिल्यावर मी आमदार साहेबांना सांगितल्यावर सभागृह नेते परेश ठाकूर यांना सांगून त्या ठिकाणी दर 15 दिवसांनी तेथे ड्रेसिंगसाठी परिचारिका पाठवण्यास सुरुवात केली, असे माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी सांगितले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मुळे आम्हाला पिवळी रेशन कार्ड मिळाली संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला आहे. या वसाहतीतून जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता आम्हाला जखमा असल्याने चिखलातून दवाखान्यात जाताना त्रास व्हायचाआमदारांना आमची अडचण सांगताच त्यांनी येथील रस्ता करून दिला. आम्हाला औषध व मलम पट्टीची सोय करून दिली. कोरोनाच्या काळात दिवाळीत आम्हाला रेशन दिले, असे श्री गणेश कुष्ठरोग वसाहतीचे प्रकाश पाटेकर यांनी सांगितले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …