Breaking News

रायगडात 135 नवे कोरोना रुग्ण; दोन जणांचा मृत्यू

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात नव्या 135 कोरोना रुग्णांची आणि दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी (दि. 31) झाली, तर दिवसभरात 164 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 78 व ग्रामीण 17) तालुक्यातील 95, खालापूर व पेण प्रत्येकी सात, महाड सहा, उरण व रोहा प्रत्येकी पाच, माणगाव तीन, अलिबाग, सुधागड व श्रीवर्धन प्रत्येकी दोन आणि कर्जत तालुक्यातील एकाचा समावेश आहे, तर मयत झालेले दोन्ही रुग्ण पनवेल तालुक्यातील आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 53,999 आणि मृतांची संख्या 1552 झाली आहे. आतापर्यंत 51,115 जण कोरोनामुक्त झाल्याने 1332 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा पाठपुरावा

मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा आणि त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न …

Leave a Reply