Breaking News

नवी मुंबईत मोफत फिरता दवाखाना

भारतीय जनता पक्षाचा अभिनव उपक्रम

नवी मुंबई : बातमीदार

सध्याच्या कोरोना महामारीवर मात करत असताना अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांवर आलेले संकट पाहता तसेच कोरोनासारखे आजारावर मात करण्याकरिता आपल्या बेलापूर मतदारसंघातील नागरिकांसाठी अभिनव उपक्रम म्हणून आमदार मंदा म्हात्रे यांच्या सौजन्याने नवी मुंबई महानगरपालिका व एचडीएफसी बँक यांच्या माध्यमातून मतदारसंघातील सर्व प्रभागात मोफत फिरता दवाखाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबईतील सामान्यांसाठी दिवाळीनिमित एकप्रकारे भेटच ठरणार आहे.

या फिरत्या दवाखान्यात मोफत प्रथमोपचार, मोफत तपासणी, मोफत बीपी व मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. मोफत औषधेही वितरीत करण्यात येणार आहेत. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकांना याचा लाभ घेता यावा, याकरिता मतदारसंघातील सर्व 51 प्रभागात हा मोफत फिरता दवाखाना संपूर्ण एक महिन्याकरिता उपलब्ध करण्यात येणार आहे.  मंगळवारी (दि. 17 नोव्हेंबर) पासून मोफत फिरता दवाखान्याचे लोकार्पण करण्यात येणार असून सकाळी 8 ते दुपारी 1 व दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत असे दिवसातून दोन टप्प्यात सदर मोफत फिरता दवाखाना नागरिकांसाठी सुरू असणार आहे. हा फिरता दवाखाना सुरू होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग, विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता सर्वत्र वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या कोरोनाची लाट ओसरत असली तरी निष्काळजीपणा बाळगू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. हीच बाब लक्षात घेत आमदार मंदा म्हात्रे यांनी फिरत्या दवाखान्याचा उपक्रम राबवण्याचा निश्चय केला असून, सामन्यांना किरकोळ आजारांवर मोफत तपासणी मिळाल्यास तातडीने उपचार होऊन रुग्ण बारा होण्यास मदत होणार आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply