Breaking News

शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत

कर्जत : बातमीदार

पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शिक्षक व अन्य शासकीय कर्मचार्‍यांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून करावेत, अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेकडून करण्यात आली आहे. कर्जतचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी यांच्या मार्फत हे निवेदन रायगड जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी संघटनेचे अ‍ॅड. कैलास मोरे,  हरिश्चंद्र यादव, सुनिल गायकवाड, धर्मेद्र मोरे, प्रदीप ढोले, राहुल गायकवाड, लोकेश यादव आदी उपस्थित होते.

 रायगड जिल्हा परिषद अंतर्गत असणार्‍या सर्व शिक्षकांचे पगार गेल्या अनेक वर्षापासून एका विशिष्ट सहकारी बँकेमार्फत होत आहेत. त्यामुळे या कर्मचार्‍यांना राष्ट्रीयकृत बँकेच्या विविध योजनांचे फायदे उचलता येत नाहीत. पाल्यांसाठी उच्च शैक्षणिक खर्च तसेच विमा आणि मेडीक्लेम आदी सुविधा राष्ट्रीयकृत बँकेकडून चांगल्या प्रकारे दिल्या जातात. मात्र अनेक शिक्षक आणि त्यांच्या परिवाराला या सर्व सुविधांपासून वंचित राहावे लागते. या कारणांमुळे शिक्षक व अन्य शासकीय कर्मचार्‍यांचेे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावेत, असे निवेदनात म्हटले आहे.

शिक्षक व अन्य शासकीय कर्मचार्‍यांचे पगार खाते किंवा सॅलरी अकाऊंट कुठल्या तरी एका विशिष्ट बँकेत असावेत,  असा कोणताही जीआर महाराष्ट्र शासनाने काढलेला नाही. महत्वाचे म्हणजे राज्यातील अनेक जिल्ह्यातील शिक्षकांचा पगार राष्ट्रीयकृत बँकेतून होतात. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील  शिक्षक व शासकीय कर्मचार्‍यांचे पगार राष्ट्रीयकृत बॅकेतून व्हावेत, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply