Breaking News

लाल महालात लावणीप्रकरणी डान्सरसह चौघांवर गुन्हा दाखल

पुणे ः प्रतिनिधी

पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर आधारित रिल्सचे शुटिंग केल्याप्रकरणी डान्सर वैष्णवी पाटील हिच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या लाल महाल पुणे महापालिकेने पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. असे असताना या ठिकाणी तमाशाप्रधान चंद्रमुखी चित्रपटातील चंद्रा गाण्यावर आधारित रिल्सचे शुटिंगचे करण्यात आले. यावर संभाजी ब्रिगेडने तीव्र आक्षेप घेतला होता. लाल महालात लावणी नृत्य सादर करून त्याची ध्वनीचित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करून भावना दुखावल्याप्रकरणी वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रखवालदार राकेश सोनवणे यांनी फिर्याद दिली.

वैष्णवी पाटीलचा जाहीर माफीनामा – लाल महालात चित्रपटातील एका लावणीवर आधारित रिल्समध्ये झळकलेली डान्सर वैष्णवी पाटील हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करीत जाहीर माफी मागितली आहे. या व्हिडीओत तिने माझ्याकडून लाल महालात लावणीचा व्हिडीओ शूट करून चूक झाली आहे. त्यासाठी मी सर्वांची माफी मागते, असे म्हटले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply