Breaking News

माथेरानची माहिती आता एका क्लिकवर!

पर्यटनविषयक अ‍ॅप लवकरच होणार लाँच

कर्जत ः बातमीदार
माथेरानमध्ये येणार्‍या पर्यटकांच्या माहितीकरिता एक अ‍ॅप तयार करण्यात येत असून, याच महिन्यात त्याचे लाँचिंग केले जाणार आहे. माथेरान गिरीस्थान नगर परिषद आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ यांच्या माध्यमातून बहुपर्यायी अशा या अ‍ॅपची निर्मिती केली जात आहे.
निसर्गरम्य प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरान देशी-विदेशी पर्यटकांना भुरळ घालते. 2400 फूट उंचीवर असलेल्या माथेरानमध्ये वाहनांना बंदी असल्याने या ठिकाणी प्रदूषणाचा लवलेष नाही. 54 चौरस किलोमीटरवर माथेरान पसरले असून, यामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानची ओळख व माहिती डिजिटल स्वरूपातही असावी यासाठी एक अ‍ॅप बनवले जात आहे. येथे येणार्‍या पर्यटकांना पॉईंट्स, हॉटेल-रेस्टॉरंट, वन्यजीव याची इत्यंभूत माहिती यातून मिळेल तसेच दस्तुरी नाका येथे होणारी त्यांची फसवणूक थांबावी या दृष्टीनेही अ‍ॅप उपयुक्त ठरू शकते.
याशिवाय या अ‍ॅपमध्ये पर्यटकांना माथेरानमध्ये फिरण्यासाठी घोडे, हातरिक्षा, कुली आदींची सर्व माहिती असणार आहे. यात दरांचाही समावेश असेल. माथेरानच्या दस्तुरी नाका येथे एन्ट्री तिकिट घेतल्यानंतर वायफायच्या मदतीने क्यूआर कोड स्कॅनद्वारे हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल तसेच गुगल आणि अ‍ॅपलच्या प्ले स्टोअरवरूनही ते उपलब्ध असणार आहे.
या अ‍ॅपमध्ये विविध उपयोगी फिचर असून, हे अ‍ॅप अजून दर्जेदार बनविण्यासाठी आपल्या सर्वांच्या सूचना आणि कल्पना आमच्यापर्यंत पाठवा किंवा कमेंट्स शेअर करू शकता, असे आवाहन माथेरान पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply