पनवेल ः रायगड
जिल्ह्यात सोेमवारी (दि. 14) नव्या 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (महापालिका 22 व ग्रामीण 15) तालुक्यातील 37, पेण सात, रोहा चार, अलिबाग तीन, पोलादपूर दोन आणि कर्जत व मुरूड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल व अलिबाग तालुक्यातील आहे. दरम्यान, नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 59,107 झाला असून, मृतांची संख्या 1617 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 56,775 जण कोरोनामुक्त झाले असून, 715 सक्रिय रुग्ण आहेत.