Breaking News

दक्षिण रायगडमध्ये पाण्यासाठी वणवण

माणगावातील 30 गावे 30 वाड्या तहानेने व्याकुळ

माणगाव : प्रतिनिधी : माणगाव तालुक्यातील 30 गावे व 30 वाड्यांना पाणीटंचाई जाणवत असून, तेथील ग्रामस्थांची मार्च महिन्यापासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत जात असल्याने यंदा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. गेल्या वर्षी माणगाव तालुक्यातील 14 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. ती सर्व गावे या वेळीही पाण्याने व्याकुळ झाली आहेत. तालुक्यातील कुंभेवाडी, पळसगाव बुद्रुक, धनगरवाडी, सांगी आदिवासी वाडी, वडवली गौळवाडी, उमरोली बौद्धवाडी, उमरोली, सणसवाडी, कोंडेथर, कातळवाडी, मशीदवाडी, बौद्धवाडी, उधळेकोंड, बामणगाव, केळगण, कुंभे, कामतवाडी, मोरेवाडी, जोर, चांदे आदिवासीवाडी, कुंभार्ते, जांभूळमाळ आदी गावांना दरवर्षीप्रमाणे यंदाही पाणीटंचाईचे चटके बसू लागले आहेत. या गावांना दरवर्षी साधारण एप्रिल महिन्यात टँकरने पाणीपुरवठा केला जातो, तसेच काही वाड्यांत रस्ता नसल्याने बैलगाडीने पाणीपुरवठा केला जातो. माणगाव तालुक्यातील 30 गावे जरी पाणी पुरवठा कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात येत असली, तरी त्या व्यतिरिक्त अनेक गावांना पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे.

महाड तालुक्यामध्ये 13 टँकरची मागणी, तर 49 विंधण विहिरींना मंजुरी

महाड : प्रतिनिधी : महाड तालुक्यामधील 13 गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र आतापर्यंत केवळ दोन वाड्यांनाच पाणीपुरवठा करण्यास मंजुरी देण्यात आली असून लवकरच त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, या 49 विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आली असल्याचे महाड पंचायत समितीकडून सांगण्यात आले. तालुक्यातील कावळे तर्फे विन्हेरे धनगरवाडी, पिंपळकोंड, नागाव फौजदारवाडी, कुंभार्डे धनगरवाडी, पाचाड बाऊलवाडी, पाचाड मोहल्ला, पाचाड नाका, पाचाड गाव, पाचाड ग्रामीण रुग्णालय, पाचाड बौद्धवाडी, रावतळी मानेधार, रावतळी गीझेवाडी-खरबकोंड आणि जिते तेरडेवाडी या गावांना पाणीटंचाई भेडसावत असून, त्यातील पिंपळकोंड आणि कावळे तर्फे विन्हेरे धनगरवाडी या दोन वाड्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे.महाड पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे 13 टँकरची मागणी आली असून, त्यापैकी केवळ एक टँकरला मंजुरी देण्यात आली आहे, तर या वर्षीला 49 विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी विन्हेरे बागआळी, विन्हेरे वरचीआळी, विन्हेरे रोहिदास नगर, करंजाडी नटेवाडी, अप्पर तुडील मोहल्ला, वामने नाकातेआळी, नागाव फौजदार वाडी, मोहोप्रे आदिवासी वाडी आणि पारमाची वाडी या गावांतील विंधण विहिरींना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, त्यांची कामे सुरू झाली आहेत.

या वर्षी पाणीपुरवठा कृती आराखड्यात तालुक्यातील 7 गावे आणि 42 वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. तालुक्यात 293 विंधण विहिरींचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी 49 विंधण विहिरींना मंजुरी देण्यात आली असून, त्यातील नऊ विंधण विहिरींना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत. -प्रमोद गोडांबे,  गटविकास अधिकारी, महाड

पोलादपूर तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट

पोलादपूर : प्रतिनिधी : यंदाच्या पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यामध्ये टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील 23 गावे आणि 106 वाड्यांची मागणी निश्चित करण्यात आली असून, या 129 ठिकाणी पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी सुमारे 24.81 लाख रुपयांची तरतूद आराखड्यामध्ये करण्यात आली आहे. पोलादपूर तालुक्यातील चांभारगणी खुर्द, किनेश्वर, निवे, ताम्हाणे, कोतवाल खुर्द गावठाण, वाकण गावठाण, काटेतळी, बोरघर, गोळेगणी, ओंबळी गावठाण, आडावळे खुर्द, गोवेले गावठाण, खांडज, साळवी कोंड, खोपड, ढवळे, आडावळे बु. गावठाण, कोतवाल बुद्रुक गाव, कुडपण खुर्द, तुटवली गाव, पैठण गाव, कातळी, चरई गावठाण आदी गावे, तसेच आडावळे बु. बौद्धवाडी, आडावळे बुद्रुक सोनारवाडी, आवळी बु. खडकवाडी, आडावळे बु. एरंडवाडी, आडावळे बुद्रुक, आडावळे बु. चिखली, कुडपण बु. महाणीवाडी, मोरसडे दिवाळवाडी, मोरसडे आडाचाकोंड, मोरसडे भगतपेढा, मोरसडे भोसाडवाडी, मोरसडे गवळ्याचा कोंड, मोरसडे सडेकोंड, मोरसडे शेंदवाडी, मोरसडे नावाळे, तुटवली  गळतीची वाडी, तुटवली धनगरवाडी, परसुले धनगरवाडी, पळसुले क्षेत्रपाल, क्षेत्रपाल धनगरवाडी, गोपाळ आमलेवाडी, कापडे जननीचा माळ, कापडे दहिदुर्गवाडी, कापडे दुर्गवाडी, कापडे कोसमवाडी, कापडे चिरेखिंड, कापडे कुंभळवणे, कापडे बौद्धवाडी, कापडे पायटेवाडी, भोगाव खुर्द, भोगाव खुर्द दत्तवाडी, भोगाव खुर्द पार्टेवाडी, भोगाव खुर्द येलंगेवाडी, पैठण आदिवासी वाडी, पैठण गणेश वाडी, गोवेले आदिवासी वाडी, गोवेले बौद्धवाडी, गोवेले महादेवाचा मुरा, गोवेले तळ्याची वाडी, ढवळे बौद्धवाडी, ढवळे आदिवासी वाडी, कोतवाल खुर्द धनगरवाडी, कोतवाल खुर्द रेववाडी, कालवली विठ्ठलवाडी, कालवली भोसलेवाडी, कालवली तिवडेकर मोहल्ला, कालवली पाटील वाडी, कालवली बौद्धवाडी, कालवली वलीले मोहल्ला, महालगूर मोरेवाडी, महालगूर तांमसडेवाडी, देवळे दाभिळ, देवळे हळदुळे, देवळे केवनाळे, सोनारवाडी, देवळे आंबेमाची, देवळे करंजे, वाकण बौद्धवाडी, वाकण मुरावाडी, वाकण सानेवाडी, बोरावळे गुढेकरकोंड, बोरावळे खोतवाडी, बोरावळे मोरेवाडी, बोरावळे कोडबे कोंड, बोरावळे चाळीचा कोंड, बोरघर महादेवाचा मुरा, कामथे देऊळमाळ, बोरघर, कामथे माडाचीवाडी, कामथे जांभाडी, कामथे आदिवासी वाडी, कामथे फौजदारवाडी, वडघर देऊळमाळ, वडघर सणस पेढा, वडघर फौजदारवाडी, वडघर पाटील वाडी, वडघर ऊलालकरवाडी, वडघर सणसवाडी, चरई वडाचा कोंड, सडवली आदिवासी वाडी, सडवली चोळई, कोतवाल बुद्रुक कदमवाडी, कोतवाल बुद्रुक दाभाडवाडी, कोतवाल बुद्रुक वरची वाडी, कोतवाल बौद्धवाडी, गोळेगणी येरुणकरवाडी, गोळेगणी देऊळवाडी, ओंबळी बौद्धवाडी, ओंबळी तामसडेवाडी, ओंबळी हनुमान वाडी, ओंबळी दत्तवाडी, बोरज साखर देऊळकोंड, बोरज साखर रिंगेवाडी, बोरज साखर, बोरज साखर खडकवाडी, बोरज साखर सुतारवाडी, बोरज साखर पेढेवाडी, पळचिल धनगरवाडी, पळचिल जलाची वाडी, पळचिल खडकवणे, पळचिल सावरीची वाडी, पळचिल ऊंबरकरवाडी या 106 वाड्यांमधील 14 हजार 925 लोकसंख्येला भासणारी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई निवारण करण्याचे आव्हान उभे आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply