पनवेल : रामप्रहर वृत्त – गणेशोत्सव गोड व्हावा म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भाजप पनवेल यांच्या वतीने 60 हजार कुटुंबीयांना प्रसादाच्या स्वरूपात अन्नधान्य वाटप करण्यात आले. त्या अनुषंगाने ओवे गावात सुमारे 100 गरजू गणेशभक्तांना धान्याचे वाटप केले गेले.
या वेळी अल्पसंख्याक समाजाचे नेते मन्सूर पटेल, खारघर-तळोजा मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे, बूथ अध्यक्ष संदीप ठाकूर, लालजी वर्मा, रणजित सिंग, फिरोज भाई व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक नागरिकांनी या स्तुत्य सामाजिक कार्याचे कौतुक केले.