कामोठे : रामप्रहर वृत्त
कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई बोर्ड सुरू करण्यात आले आहे. या शाळेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्था सातार्याच्या उपाध्यक्षा जयश्री चौघुले यांच्या हस्ते व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी करण्यात आले.
या वेळी सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब कराळे, जॉइंट सेक्रेटरी विलासराव महाडिक, कायदेविषयक सल्लागार अॅड. डी.आय. एस. मुल्ला, ओएसडी शहाजी फ़डतरे, रायगड विभागीय निरीक्षक संजय मोहिते, उपनिरीक्षक शहाजी फडतरे, खारघर पब्लिक स्कूल मुख्याध्यापिका राज अलोनी, बी. डी. कारंडे, प्राचार्य गणेश ठाकूर, विलास शिवकर, मॉर्डन कॉलेजच्या एम. एस. भोसले, वाशी कॉलेजचे प्राचार्य व्ही.एस.शिवणकर, प्राचार्य अरविंद बुरुंगुळे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, प्रभारी मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, रयत सेवक आणि मान्यवर उपस्थित होते. जॉइंट सेक्रेटरी विलासराव महाडिक रयतच्या शताब्दी महोत्सवी वर्षात सीबीएसई बोर्डाची पहिली शाळा असावी असा उल्लेख केला. कायदेविषयक सल्लागार अॅड. डी.आय. एस. मुल्ला यांनीही मनोगत व्यक्त केले.कराळे यांनी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमाचा समावेश सीबीएसई बोर्डाच्या शाळेत असतो असे सांगीतले.मुख्याध्यापिका राज अलोनी यानी शाळेचे महत्व विषद केले.रायगड विभागीय निरीक्षक संजय मोहिते यांनी आभार व्यक्त केले.