कर्जत : प्रतिनिधी : तालुक्यातील गौरकामत गावाच्या हद्दीतील जंगल भागात गावठी हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळताच कर्जतच्या पोलीस निरीक्षक तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शरद देठे, नाईक सचिन नरुटे, महिला पोलीस नाईक दीपाली खडे, पोलीस शिपाई गजानन केंद्रे, वाकोजी कोलमकर, सागर नायकुडे, गणेश पवार यांच्या पथकाने पोलीस पाटलांच्या सहकार्याने बुधवारी (दि. 3) सायंकाळी त्या ठिकाणी घाड टाकली. त्या वेळी तेथे लपवलेल्या 20 पत्र्याच्या टाक्या, 10 प्लॅस्टिकच्या टाक्या व 200 लिटर क्षमतेचे चार ड्रम, त्यामध्ये सुमारे 2 हजार लिटर रसायन व इतर साहित्य असा सुमारे 70 हजार रुपये किमतीचा माल मिळून आला. पोलिसांनी त्या रसायनाचा जागीच नाश केला. या वस्तू बेवारस स्थितीत मिळून आल्याने तो माल कोणाचा आहे याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …