Breaking News

पनवेल मनपा करणार खेळांच्या मैदानांचा विकास

खारघरमधील मैदानांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
 सिडकोने पनवेल महापालिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने पालिकेकडे हस्तांतरित केली आहेत. ही उद्याने आणि खेळाची मैदाने महापालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 28) खारघरमधील उद्याने आणि खेळाच्या मैदानांची पाहणी करून अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
सिडकोच्या वतीने महापालिका हद्दीतील उद्याने आणि खेळाची मैदाने हस्तांतरित करण्यात आली आहेत. त्यानुसार ही मैदाने आणि उद्याने विकसित तसेच त्यात महापालिकेकडून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार खारघर सेक्टर 10, 2, 5, 7, 11, 21 आणि 19मधील उद्याने आणि खेळाच्या मैदानांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकारी आणि नगरसेवकांसह पाहणी करून या संदर्भात अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
या वेळी स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, नगरसेवक हरेश केणी, प्रवीण पाटील, निलेश बाविस्कर, रामजी बेरा, अ‍ॅड. नरेश ठाकूर, नगरसेविका हर्षधा उपाध्याय, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, वासुदेव पाटील, समीर कदम, अमर उपाध्याय, किरण पाटील, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष कीर्ती नवघरे, महापालिकेचे उपायुक्त धैर्यशील जाधव आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply