Breaking News

रायगडातील 40 हजार मतदारांची नावे यादीतून वगळण्याचा प्रस्ताव

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात ज्यांचे मतदार यादीत फोटो नाहीत, दुबार नावे, स्थलांतरित, मृत्यू पावलेले असे 60 हजार मतदार आहेत. त्यातील 40 हजार मतदारांची नवे रायगड जिल्ह्यातील यादीतून वगळण्यात यावीत, असा प्रस्ताव रायगड जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून 16 हजार 298 मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.  
मतदार नावनोंदणीसाठी राबविलेल्या मोहिमेतून 20 हजार 330 नवमतदारांची नोंदणी झाली आहे. रायगड जिल्ह्यात आजघडीला 23 लाख19 हजार 746 एकूण मतदार आहेत. यात 11 लाख 39 हजार 939 स्त्री मतदार आहेत. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत मतदारांचे प्रमाण 72 टक्के आहे. 97 टक्के मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. मतदार यादीत छायाचित्र असलेल्या मतदारांची टक्केवारी 96 टक्के आहे.
विशेष मोहीम राबवून निवडणूक विभागाने मतदार याद्यांमधील दुबार किंवा मृत तसेच पत्त्यावर न सापडलेल्या मतदारांच्या नावांची यादी तयार केली. ही सारी नावे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली होती, तसेच प्रत्येक मतदाराला नोटीस बजावण्यात आली होती. मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना वगळण्यात येणार्‍या नावांची माहितीही सादर करण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून रायगड जिल्ह्यातील सुमारे 16 हजार 298 नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात आली आहेत.

विशेष मोहीम राबवून मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. दुबार नावे, स्थलांतरित,  मृत्यू पावलेले असे 60 हजार मतदार रायगड जिल्ह्यात आहेत. त्यातील  40 हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार 16 हजार 298 नावे मतदार याद्यांमधून वगळण्यात आली आहेत.
-वैशाली माने, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा, रायगड

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply