Breaking News

मॉर्निंग वॉकसाठी जाताना भीषण अपघात

एकाच कुटुंबातील तिघांवर काळाची झडप

लोणंद ः प्रतिनिधी
खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळ गुरुवारी (दि. 28) मॉर्निंग वॉकला निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मृतांमध्ये वृद्ध दाम्पत्य आणि त्यांच्या सुनेचा समावेश आहे.
लोणंद-खंडाळा रस्त्यावरील शेळके वस्तीजवळील घाडगे मळा परिसरात गुरुवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास बबन धायगुडे (70), शांताबाई धायगुडे (64) व सारिका धायगुडे (34) हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. घरापासून खंडाळ्याच्या दिशेने काही अंतर गेल्यानंतर एका भरधाव कारने त्यांना समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात बबन धायगुडे व शांताबाई धायगुडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्यांची सून सारिका धायगुडे गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच आसपासचे ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी सारीका धायगुडे यांना तत्काळ स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यानंतर त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
अपघातानंतर घटनास्थळावरून निघून गेलेले वाहन माळेगाव ता. बारामती येथे आढळले. घटनास्थळी वाहनाची नंबर प्लेट आढळली. त्यावरून पोलिसांनी शोध घेतला असता माळेगाव (ता. बारामती) येथे रस्त्याच्या बाजूला वाहन उभे करून चालक फरार झाल्याचे समोर आले.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply