चेन्नई : वृत्तसंस्था
आगामी कसोटी मालिकेसाठी आम्ही पूर्ण तयारी केली असून, भारताच्या प्रत्येक खेळाडूविरुद्ध आम्ही खास रणनीती आखली आहे, असे मत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने व्यक्त केले. भारतीय संघातील कोणत्या खेळाडूपासून इंग्लंडला सर्वाधिक धोका आहे, असे विचारले असता आर्चर म्हणाला, ‘भारताच्या संघातील सर्वच खेळाडू एकापेक्षा एक सरस आहेत. ऑस्ट्रेलियाने भारताच्या दुसर्या फळीतील खेळाडूंना कमी लेखण्याची चूक केली आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. त्यामुळे आम्ही भारताच्या प्रत्येक खेळाडूच्या कमकुवत बाजूंचा अभ्यास करीत असून, प्रत्यक्षात सामन्यादरम्यान त्यांच्याविरुद्ध आखण्यात आलेली रणनीती दाखवून देऊ.’, असे इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने म्हटले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. जोफ्रा आर्चरची या मालिकेत इंग्लंडच्या संघात वर्णी लागली आहे. व्हर्चुल पत्रकार परिषदेत बोलताना आर्चर म्हणाला की, भारतामध्ये मी याआधी कधीही कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही. त्यामुळे वास्तवात आयपीएल आणि कसोटी सामन्याची तुलना आपण करू शकत नाही. भारतीय संघातील सर्वच फलंदाज एकापेक्षा एक असे सरस आहेत. पहिल्या सहा क्रमांकापर्यंतचा कोणताही फलंदाज शतक झळकावू शकतो. रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यासारखे दर्जेदार फलंदाज असतील.