Breaking News

कोविशिल्ड लशीच्या जगभर वापरास ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी

नवी दिल्ली : भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करीत असलेली कोरोना लस कोविशिल्डचा वापर आता जगभरात होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनका यांनी तयार केलेल्या दोन लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या लशीशिवाय दक्षिण कोरियाच्या एस्ट्राझेनका एसकेबायो या लशीचा समावेश आहे. डब्ल्यूएचओने सांगितले की, ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनकाच्या दोन लशींना आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. जगभरात कोव्हॅक्स अंतर्गत लसीकरण मोहीम राबवता येईल यासाठी ही मंजुरी दिली आहे. आपल्याला अजून व्हॅक्सिनच्या उत्पादनाचा वेग वाढवायला हवा, असे डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडहानॉम यांनी म्हटले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply