Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने भाताणपाडा येथे बसविणार ट्रान्सफॉर्मर

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचे प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भाताणपाडा येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विद्युत ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहेत. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष व उरण मतदारसंघ निवडणूक प्रमुख अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 14) झाले.
भाताण ग्रामपांयतीमधील नागरिकांना पावसाळ्यात तसेच पुढील काळात विजेची समस्या उद्भवू नये याकरिता पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक बबन मुकादम यांनी आमदार महेश बालदी यांच्यासमेवत चर्चा केली होती. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या 11 लाख रुपये निधीमधून ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.
भूमिपूजन समारंभास भाताणचे सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच बाळाराम मुकादम, माजी सरपंच सुभाष भोईर, गुरूनाथ खरके, माजी उपसरपंच वसंत काठावले, सदस्य अरुण पाटील, रजनी किरण मुकादम, अनिल काठावले, रसिका भोईर, अरुणा गाताडे, सुभाष मुकादम, शंकर मुकादम, सावळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रफुल माळी, शिवाजी माळी, एमएससीबीचे अधिकारी श्री. खिलारे, ठेकेदार योगेश लबडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हे काम मार्गी लावल्याबद्दल माजी नगरसेवक बबन मुकादम आणि भाजप महिला मोर्चाच्या उत्तर रायगड सरचिटणीस प्रिया मुकादम यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply