Breaking News

विद्यार्थ्यांनी बनविले शाडूच्या मातीचे गणपती

पनवेल : वार्ताहर

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलमार्फत शाडूच्या मातीचे गणपती बनवण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शक कार्यशाळा वि. खं. विद्यालयात आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक पी. बी. ठाकूर सर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत 180 विद्यार्थी सहभागी झाले होते. दोन विद्यार्थी मिळून एक गणपती बनवायचा असे बियाणेयुक्त शाडूच्या मातीचे वाटप  करण्यात आले. 40 ते 45 सुबक गणपती बाप्पा या विद्यार्थ्यांनी बनविले. या कार्यशाळेत इरा आर्टस्च्या रूपाली मदन व त्यांच्या सहकार्‍यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत गणेशमूर्ती बनविण्यासाठीचे शिक्षण दिले. शाळेचे कलाशिक्षक नेरूरकर सर यांनी ही कार्यशाळा आयोजित करण्यात मोठा पुढाकार घेतला. या कार्यशाळेला रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल अध्यक्षा प्रिया पाटील, सचिव सायली सातवळकर, डॉ. संजीवनी गुणे, आरती खेर, मेधा तांडेल, डॉ. अमोद दिवेकर, विवेक खाड्ये, माजी अध्यक्ष भगवान पाटील, संतोष घोडिंदे, ऋषी बुवा, अनिल ठकेकर, दीपक गडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी सर्व विद्यार्थ्यांना या वर्षी आपल्या घरी शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती गणेशोत्सव काळात आणाव्यात व पर्यावरण संतुलन राखावे, असे आवाहन रोटरीच्या अध्यक्षा प्रिया पाटील यांनी केले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply