Breaking News

पेणमध्ये विविध उत्पादनांचे प्रदर्शन

पेण : प्रतिनिधी

येथील बीबीएनजी आणि ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकाच्या विविध उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन पेणमधील महात्मा गांधी मंदिर सभागृहात करण्यात आले होते. या प्रदर्शनचे उद्घाटन पितांबरीचे मालक रविंद्र वामन प्रभुदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला बीबीएनजी अध्यक्ष अ‍ॅड. मंगेश नेने, संजीव जोशी उपस्थित होते. रविंद्र प्रभुदेसाई यांनी सांगितले की, जास्तीतजास्त सॅम्पल लोकांपर्यंत पोहोचवा, मार्केटिंग मॅनेजमेंट हे आपल्या व्यवसायासाठी फार आवश्यक आहे. तसेच लोकांच्या गरजा ओळखायला शिकणे आवश्यक असल्याचा सल्लादेखील त्यांनी स्टॉलधारकांना दिला. ब्राह्मण सभेचे अध्यक्ष महेश हेलवाडे यांनी आभार मानले. बीबीएनजीच्या श्रृती केळकर, उपेंद्र जोशी, वेदिका मोडक, श्रद्धा जोशी, प्रेरणा कुलकर्णी, सुमंत गोखले, ब्राह्मण सभेचे डॉ. मनोज जोशी, गौरी खरवतकर, संदीप फुडे स्टॉल धारक व ग्राहक उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply