Breaking News

अ‍ॅथलेटिक अन्नू राणीचा भालाफेकमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम

पतियाळा ः वृत्तसंस्था
अन्नू राणी हिने फेडरेसन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली, मात्र ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही.
भालाफेकपटू राणीने 63.24 मीटर अशी कामगिरी करीत स्वत:चाच 62.43 मीटरचा विक्रम मोडीत काढला, पण टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष 64 मीटर इतका आहे.
दुसरीकडे सविता पाल हिने 10 हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. किरण बलियान याने गोळाफेक प्रकारात 16.45 मीटर अशी कामगिरी करीत सुवर्णपदक प्राप्त केले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply